Posts

आरोग्य आणि रोग यासंबधी ........

Image
त्वचाशास्त्र त्वचाशास्त्र आपली त्वचा दुखापतीपासून व संसर्गापासून आपला बचाव करत असते. तसेच त्वचा उष्णता व प्रखर प्रकाशापासून बचाव करण्यासाठी आवरण म्हणुन कामी येते. आपल्या शरीराच्या तापमानाचे संतुलन राखण्यासाठी मदत करते. सभोवतालच्या वातावरणाची माहिती मेंदुपर्यत पोहचण्याचे काम त्वचेमुळेच होते. त्वचा पाणी, मेद आणि ’ड’ जीवनसत्वाचा साठा करत असते. त्वचेमधे प्रामुख्याने दोनप्रकारचे थर असतात. एपिडर्मिस आणि डर्मिस. त्वचा ही शरीराचा एक मुख्य व सर्वाधिक महत्वाचा अवयव असून त्याचे वजन जवळजवळ ६ पौंड एवढे असते. आपल्या शरीराचा सर्वात मोठा दृष्य अवयव असलेल्या त्वचेचा आपले दिसण्यात महत्त्वाचा वाटा असतो. त्वचाशास्त्र हे विशेष चिकित्सेशी संबंधीत असून यात त्वचेच्या वेगवेगळ्या आजारांचे निदान व उपचार तसेच त्वचेच्या, केसांच्या, नखांच्या ट्यूमर विषयीची माहिती सामाविष्ट असते. त्वचारोगतज्ञ हा एक असा चिकित्सक असतो ज्याने चिकित्सेद्वारे किंवा शल्यचिकित्सेद्वारे निदान व उपचारासाठी विशेष प्रशिक्षण घेतलेले असते. तसेच ट्युमर, कर्करोग, चट्टे पडणे, वाढ होणे किंवा थांबणे यामुळे त्वचा केस व नखांवर कोणते परिणाम हो...

आजारांविषयी विविध माहिती.......

Image
आजार आणि रोग माणसाच्या आजाराचे निदान प्रत्येकवेळी व्यवस्थित केले जातेच असे नाही. आपल्याला कहितरी होत असते, पण ते काय होत आहे, त्याचे नेमके वर्णन आपल्याला करता येत नाही. किंवा वर्णन केले तरी घरच्यांना कळत नाही की कुठल्या डॉक्टरांकडे जावे! त्यासाठी आरोग्य डॉट कॉम मधे आपण ‘आजार’ हा विषय हाताळत आहोत. त्यामधे आजार, सामान्य आजार, विशिष्ट आजार, संसर्गजन्य आजार असे अनेक प्रकार येतात. ह्या विभागात आपल्याला ह्या सर्व प्रकारांच्या आजारांची लक्षणेही वाचायला मिळतील. त्यामुळे आपला त्या-त्या आजाराविषयींचा गैरसमज दूर होण्यासही मदत होते. कांजण्या कांजण्या कांजण्‍या हा Varicella Zoster नावाच्‍या विषाणूमुळे होणारा आत्‍यंतिक संसर्गजन्‍य रोग आहे. यामुळे शरीरावर पाणथळ फोडांचे पुंजके उठतात. रोग लक्षणे या रोगाची रोग लक्षणे सौम्‍य आजारापासून ते शरीरावरील विखुरलेल्‍या छोटया फोडाच्‍या जखमा तसेच तीव्र स्‍वरुपाचा ताप ते सर्वांगीण पुरळ अशा स्‍वरुपाच्‍या असतात. पुरळ उठण्‍यापूर्वीच्‍या अवस्‍थेत सौम्‍य ते मध्‍यम स्‍वरुपाचा ताप, पाठदुखी, हुडहुडी व अस्‍वस्‍थ...
Image
माणसाच्या आजाराचे निदान प्रत्येकवेळी व्यवस्थित केले जातेच असे नाही. आपल्याला कहितरी होत असते, पण ते काय होत आहे, त्याचे नेमके वर्णन आपल्याला करता येत नाही. किंवा वर्णन केले तरी घरच्यांना कळत नाही की कुठल्या डॉक्टरांकडे जावे! त्यासाठी आरोग्य डॉट कॉम मधे आपण ‘आजार’ हा विषय हाताळत आहोत. त्यामधे आजार, सामान्य आजार, विशिष्ट आजार, संसर्गजन्य आजार असे अनेक प्रकार येतात. ह्या विभागात आपल्याला ह्या सर्व प्रकारांच्या आजारांची लक्षणेही वाचायला मिळतील. त्यामुळे आपला त्या-त्या आजाराविषयींचा गैरसमज दूर होण्यासही मदत होते. सामान्य आजार सामान्य आजार म्हणजे वरचे वर होणारे, फार गंभीर नसलेले परंतु लगेच उपचार घ्यावेत असे आजार. नाक वहाणे, सर्दी होणे, खोकला होणे, कफ होणे, ताप येणे हे प्रामुख्याने होणारे सर्वसामान्य आजार. तसेच पाठदुखी, पाठीवर येणारा ताण, डोकेदुखी, पोट बिघडून जुलाब होणे, ऍसिडिटी, एखाद्या अवयवावर येणारा ताण हे सुद्धा सर्वसामान्य आजार आहेत. आपल्याकडे अशा प्रकारचा एखादा आजार झाला की त्याकडे सुरवातीला हमखास दुर्लक्ष केले जाते. परंतु असे दुर्लक्ष केल्यास हे आजार वाढू शकतात आणि ते अंग...