आरोग्य आणि रोग यासंबधी ........
त्वचाशास्त्र त्वचाशास्त्र आपली त्वचा दुखापतीपासून व संसर्गापासून आपला बचाव करत असते. तसेच त्वचा उष्णता व प्रखर प्रकाशापासून बचाव करण्यासाठी आवरण म्हणुन कामी येते. आपल्या शरीराच्या तापमानाचे संतुलन राखण्यासाठी मदत करते. सभोवतालच्या वातावरणाची माहिती मेंदुपर्यत पोहचण्याचे काम त्वचेमुळेच होते. त्वचा पाणी, मेद आणि ’ड’ जीवनसत्वाचा साठा करत असते. त्वचेमधे प्रामुख्याने दोनप्रकारचे थर असतात. एपिडर्मिस आणि डर्मिस. त्वचा ही शरीराचा एक मुख्य व सर्वाधिक महत्वाचा अवयव असून त्याचे वजन जवळजवळ ६ पौंड एवढे असते. आपल्या शरीराचा सर्वात मोठा दृष्य अवयव असलेल्या त्वचेचा आपले दिसण्यात महत्त्वाचा वाटा असतो. त्वचाशास्त्र हे विशेष चिकित्सेशी संबंधीत असून यात त्वचेच्या वेगवेगळ्या आजारांचे निदान व उपचार तसेच त्वचेच्या, केसांच्या, नखांच्या ट्यूमर विषयीची माहिती सामाविष्ट असते. त्वचारोगतज्ञ हा एक असा चिकित्सक असतो ज्याने चिकित्सेद्वारे किंवा शल्यचिकित्सेद्वारे निदान व उपचारासाठी विशेष प्रशिक्षण घेतलेले असते. तसेच ट्युमर, कर्करोग, चट्टे पडणे, वाढ होणे किंवा थांबणे यामुळे त्वचा केस व नखांवर कोणते परिणाम हो...