आजारांविषयी विविध माहिती.......


Image result for आरोग्य आणि रोग

आजार आणि रोग

माणसाच्या आजाराचे निदान प्रत्येकवेळी व्यवस्थित केले जातेच असे नाही. आपल्याला कहितरी होत असते, पण ते काय होत आहे, त्याचे नेमके वर्णन आपल्याला करता येत नाही. किंवा वर्णन केले तरी घरच्यांना कळत नाही की कुठल्या डॉक्टरांकडे जावे! त्यासाठी आरोग्य डॉट कॉम मधे आपण ‘आजार’ हा विषय हाताळत आहोत.
त्यामधे आजार, सामान्य आजार, विशिष्ट आजार, संसर्गजन्य आजार असे अनेक प्रकार येतात. ह्या विभागात आपल्याला ह्या सर्व प्रकारांच्या आजारांची लक्षणेही वाचायला मिळतील. त्यामुळे आपला त्या-त्या आजाराविषयींचा गैरसमज दूर होण्यासही मदत होते.

कांजण्या

कांजण्या

कांजण्या

कांजण्‍या हा Varicella Zoster नावाच्‍या विषाणूमुळे होणारा आत्‍यंतिक संसर्गजन्‍य रोग आहे. यामुळे शरीरावर पाणथळ फोडांचे पुंजके उठतात.

रोग लक्षणे

या रोगाची रोग लक्षणे सौम्‍य आजारापासून ते शरीरावरील विखुरलेल्‍या छोटया फोडाच्‍या जखमा तसेच तीव्र स्‍वरुपाचा ताप ते सर्वांगीण पुरळ अशा स्‍वरुपाच्‍या असतात.
पुरळ उठण्‍यापूर्वीच्‍या अवस्‍थेत सौम्‍य ते मध्‍यम स्‍वरुपाचा ताप, पाठदुखी, हुडहुडी व अस्‍वस्‍थता अशी लक्षणे साधारणपणे २४ तासांपर्यंत राहतात. प्रौढांमध्‍ये ती साधारण पुरळ उठण्‍या अगोदर २ ते ३ दिवस राहतात. उठण्‍याच्‍या अवस्‍था ही लहान मुलांमध्‍ये तापाने पुरळ उठण्‍याची अवस्‍था सुरु होते.
पुरळ शरीराच्‍या दोन्‍ही बाजूस उठतात. प्रथमतः शरीराच्‍या पुढील व मागील मुबलक भागांवरील प्रमाणात दिसतात. चेहरा, हात, पाय, या जागी ते कमी प्रमाणात आढळतात. त्‍यानंतर श्‍लेष्‍म भागावर (तोंडाच्‍या व घशाच्‍या आतील भाग) यावर उठतात. हाताचे तळवे व पायाचे तळव्‍यांवर यामुळे प्रभाव पडत नाही. शरीरावर पुरळांच्‍या निर्मितीचे विविध टप्‍पे आढळतात व साधारणपणे ४ ते ७ दिवसानंतर खपली धरावयास सुरुवात होते
.भारतीयांचे दुर्दैव असे आहे की, आपल्याला शहाणपण शिकवण्याचे अधिकार हल्ली अशा निर्बुद्ध माध्यमांच्या हाती गेलेले आहेत. ज्यांना कारणमीमांसा वा चिकित्साही करण्याची काहीही गरज वाटत नाही. लोकांना शहाणे करण्यापेक्षा जनतेची दिशाभूल करून सनसनाटी माजवण्यात पुरुषार्थ वाटू लागला आहे. मग देश व लोकांची मानसिकता अधिकाधिक रोगट बनत गेली, तर नवल नाही.
स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला उत्तर प्रदेशातील गोरखपूरच्या एका इस्पितळात बालमृत्यूने थैमान घातलेले होते. दोन दिवसांत त्या रुग्णालयात ६० हून अधिक बालकांचा एका असाध्य आजाराने मृत्यू झाला आणि माध्यमांना एक मोठी सनसनाटी बातमी मिळाली. मग इतक्या मोठय़ा संख्येने बालकांचा मृत्यू कसा झाला, त्याचा शोधही घेतला गेला नाही आणि त्याचे खापर कोणावर वा कशावर फोडता येईल, याची झटपट चाचणी झाली. प्राणवायुअभावी मुलांचा नरसंहार झाल्याचा निष्कर्ष काढला गेला. भारतीयांचे दुर्दैव असे आहे की, आपल्याला शहाणपण शिकवण्याचे अधिकार हल्ली अशा निर्बुद्ध माध्यमांच्या हाती गेलेले आहेत. ज्यांना कारणमीमांसा वा चिकित्साही करण्याची काहीही गरज वाटत नाही. लोकांना शहाणे करण्यापेक्षा जनतेची दिशाभूल करून सनसनाटी माजवण्यात पुरुषार्थ वाटू लागला आहे. मग देश व लोकांची मानसिकता अधिकाधिक रोगट बनत गेली, तर नवल नाही. पहिली बाब म्हणजे अशा रीतीने कुठल्या आजाराने, साथीच्या रोगाने बालके वा माणसांचे मृत्यू होणे, आपल्या देशाला नवे नाही.
कारण आपल्या देशात रोगटपणालाच आरोग्य संबोधले जात असते. आरोग्य आणि रोग यांच्यात कुठलाही संबंध नसल्याचे कुणाला ठाऊकही नसावे, याचेच खरे नवल आहे. आरोग्याचा संबंध मानवाच्या निरोगी असण्याशी आहे. ज्याला आजार जडला वा बाधा झाली, तिथे आरोग्य संपलेले असते. मग ती एक व्यक्ती असो किंवा शेकडय़ांनी लोक असोत. आरोग्याचा संबंध वैद्यकीय सेवेशी नसून निरोगी समाजजीवनाशी आहे. पण आपल्या देशातील आरोग्य व्यवस्था हीच वैद्यकीय सुविधा मानली जाते. त्याचा अर्थ इतकाच की तुम्हाला रोगबाधा झाल्याखेरीज तुमचा आरोग्याशी संबंध नाही, असेच गृहीत धरलेले आहे. तुम्ही निरोगी असाल, तर तुमचा आरोग्याशी काहीही संबंध नाही, असेही त्यातले गृहीत आहे.
वाहिन्यांवर या बालमृत्यूचे काहूर माजलेले असताना एका कुठल्या इस्पितळात भटकी कुत्री कशी तिथे मोकाट वावरत आहेत, त्याचे चित्रण कौतुकाने दाखवले जात होते. या चित्रणाचे व त्याविषयी बातमी रंगवणा-या पत्रकार वाहिनीच्या बेअक्कल असण्याचा तोच सर्वात मोठा पुरावा होता. कारण ही बातमी नव्हती तर ती भारतातील आरोग्य व्यवस्थेची एक वस्तुस्थिती आहे. गोरखपूर किंवा कुठल्याही नगण्य जिल्हा रुग्णालयातील स्थिती सोडा. मुंबई दिल्लीसारख्या महानगरातील सार्वजनिक आरोग्य केंद्र वा इस्पितळात यापैकी कोणी पत्रकार वा कॅमेरे कधीच गेलेले नसावेत किंवा त्यांनी कधी अशा इस्पितळांना डोळसपणे बघितलेले नसावे. कारण देशातल्या कुठल्याही सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत गेलात, तर तिथे अशा कुत्रे वा अन्य प्राण्यांचा मुक्त वावर सहज नजरेत भरत असतो.
तिथे जागोजागी माजलेले उकिरडे किंवा घाणकचरा चष्माही न घालत दिसू शकत असतो. मग या एका इस्पितळात कुत्रे मोकाट असल्याची बातमी कशी होऊ शकते? तिथे माजलेला घाणकचरा बातमी कशी होऊ शकते? ह्यालाच आपल्या देशात सार्वजनिक आरोग्य म्हणतात, हे भारतातल्या पत्रकार माध्यमांना आताच कळले आहे काय? आरोग्याचा थेट व पहिला संबंध स्वच्छता व निरोगी जीवनाशी असतो, हे तरी या पत्रकार माध्यमांना कधी कळलेले आहे काय? नुसती अत्याधुनिक यंत्रे व साधने कुठल्या चार भिंतींच्या आत आणून ठेवली वा बाहेरून त्या इमारतीला निळ्या चकचकीत काचा लावल्या; म्हणून तिथली आरोग्य व्यवस्था आधुनिक होत नाही. त्या साधनांपेक्षा किंवा तिथे काम करणा-या डॉक्टरांच्या कौशल्यापेक्षाही तिथली स्वच्छता व निरोगी वातावरण ही पहिली अट असायला हवी. ज्याचे नामोनिशाण देशातल्या कुठल्याही कोप-यात सार्वजनिक इस्पितळ किंवा आरोग्य केंद्रात आढळणार नाही. अशा प्रत्येक केंद्रात रोगप्रसाराची सुविधा अधिक प्रभावी असते.
घाणकचरा, वा पशूंना चघळता खाता येतील, अशा पदार्थाचा ढीग जमतो, तिथे कुत्री-मांजरे वा अन्य सजीव प्राणी बिनबुलाये मेहमान म्हणून हजर होतात. अशा प्राणी व पशूंच्या अंगावरून अनेक विषाणू व जीवाणूंचा अखंड वावर असतो आणि त्यातून प्राणघातक रोगांचा प्रादुर्भाव होत असतो. हे समजण्यासाठी कुठले महान विज्ञान माहीत असण्याची अजिबात गरज नाही. आजकाल वाहिन्यांचा सुळसुळाट झाल्यापासून ज्या जीवनावश्यक वस्तूंच्या जाहिराती प्रत्येक घरात अखंड गर्जत असतात, त्यामध्ये ‘हेल्दी’ म्हणजे आरोग्यदायी असा शब्द हटकून असतो. त्याचा अर्थ काय? ज्याच्या सेवनामुळे तुम्ही रोगमुक्त राहाल असे कानीकपाळी ओरडून सांगितले जात असते. जेवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवावेत. हाताला लागलेले कुठलेही जीवाणू-विषाणू पोटात गेल्यास कसे आजार होतात, ते सांगून सामान्य लोकांच्या मनात भीती निर्माण केली जाते. माल खपवण्यासाठी मोठमोठय़ा व्यापारी कंपन्याही आरोग्यासाठी जागृती करीत असतात.
मग जिथे आरोग्य व्यवस्था उभारलेली आहे, तिथे राजरोस घाणकचरा यांचे ढीग कसे असू शकतात? त्यातून आधीच बाधा झालेल्या रुग्णाला अधिकच बाधा होऊ शकते, हे आज बातम्या रंगवणा-यांच्या कसे लक्षात येत नाही? तिथे काम करणा-या डॉक्टर वा व्यवस्थापकांना कधीच कसा जाब विचारला गेला नाही? तिथे प्राणवायूचा पुरवठा नसल्याचा गदारोळ करणा-यांना प्राथमिक आरोग्य म्हणजे स्वच्छ वातावरण व परिसर, इतकेही अजून उमजलेले नाही काय? ज्या देशात सार्वजनिक जीवन घाणीने, कच-याने व सांडपाण्याने व्यापलेले आहे, तिथे निदान आरोग्यव्यवस्था तरी स्वच्छ व निरोगी असावी, इतकेही मागल्या सत्तर वर्षात इथल्या शहाण्यांच्या लक्षात आलेले नाही काय? असते, तर कुठली साधने नाहीत वा त्यात भ्रष्टाचार झाला, ते विचारण्यापेक्षा घाणीच्या रोगटपणावर पहिले बोट ठेवले गेले असते.
पण हेच तर भारतीयांचे मोठे दुर्दैव आहे, की इथे मानसिकता आजारी आणि बुद्धीलाच कीड लागलेली आहे. डॉक्टरांपासून शासकांपर्यंत आणि सामान्य माणसापासून शहाण्यांपर्यंत कोणाला आरोग्याचा वैद्यकाशी संबंध नसल्याचाही अजून बोध झालेला नाही. माणसाने आजारी पडल्यानंतर त्याला सुविधा देण्याचा विषय येतो. त्याच्या आधी आरोग्य म्हणजे त्याला कुठल्याही रोगाची बाधाच होऊ नये आणि तसे होईल ती आपत्ती असल्यासारखा प्रसंग असायला हवा. तरच तशा व्यवस्थेला आरोग्य व्यवस्था म्हणता येईल. आपण निरोगी असण्याची पूर्ण व्यवस्था असली पाहिजे आणि त्यात किरकोळ त्रुटी राहिल्याने लाखातल्या कोणा एखाद् दुस-या व्यक्तीला रोगबाधा झाल्यास उपचाराची व्यवस्था असावी. त्या व्यवस्थेला वैद्यकीय सेवा म्हणतात.
आजारी पडण्याची पूर्ण सुविधा घाणकचरा, उकिरडे व मोकाट जनावरांतून उभी करावी आणि मग त्यावर उपचाराची सज्जता नाही, म्हणून कंठशोष करण्याला आरोग्याविषयीची चिंता म्हणता येत नाही. तो निव्वळ कांगावखोरपणा आहे. व्यक्तीपासून सार्वजनिक व्यवस्थांनी स्वच्छता व निरोगी परिसरासाठी कटिबद्ध असण्यातूनच आरोग्य व्यवस्था उभी राहू शकते. अशा आरोग्य व्यवस्थेच्या परिसरात मोकाट कुत्री वा घाणकचरा असण्याविषयी नागरिकांनी तक्रार करण्यात पुढाकार घ्यावा, ह्याला आरोग्य म्हणतात. निरोगी राहण्याची इच्छा ही आरोग्याची पहिली पायरी आहे आणि त्यासाठी संघर्ष करण्याची तयारी ही आरोग्याची दुसरी पायरी आहे. त्यातला हलगर्जीपणा हा खरा आजार आहे. याकडे लक्ष वेधले पाहिजे. त्यातून सनसनाटी माजवणे, म्हणजे प्रत्यक्षात आजाराला प्रोत्साहन देणेच आहे. किंबहुना वैद्यकीय सेवेला आरोग्य सेवा संबोधणे हाच सर्वात मोठा आजार आहे. ते आजार हे रोगटपणाला आमंत्रणच आहे. आरोग्याविषयीच्या अडाणीपणाचे ते सर्वात मोठे उदाहरण आहे.

Comments

  1. आरोग्य व्यवस्थेच्या परिसरात मोकाट कुत्री वा घाणकचरा असण्याविषयी नागरिकांनी तक्रार करण्यात पुढाकार घ्यावा, ह्याला आरोग्य म्हणतात. निरोगी राहण्याची इच्छा ही आरोग्याची पहिली पायरी आहे आणि त्यासाठी संघर्ष करण्याची तयारी ही आरोग्याची दुसरी पायरी आहे. त्यातला हलगर्जीपणा हा खरा आजार आहे. याकडे लक्ष वेधले पाहिजे. त्यातून सनसनाटी माजवणे, म्हणजे प्रत्यक्षात आजाराला प्रोत्साहन देणेच आहे. किंबहुना वैद्यकीय सेवेला आरोग्य सेवा संबोधणे हाच सर्वात मोठा आजार आहे. ते आजार हे रोगटपणाला आमंत्रणच आहे. आरोग्याविषयीच्या अडाणीपणाचे ते सर्वात मोठे उदाहरण आहे.......
    हे अतिश्य बरोबर आहे...............nice information madam.......

    ReplyDelete
  2. health is wealth........अतिशय छान माहिती आहे.........

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

आरोग्य आणि रोग यासंबधी ........